नियमावली व अटी

1. सदस्यत्वाची नोंदणी

  • किमान १ वर्ष कालावधी असलेल्या विद्यापीठाच्या पदविका, पदवी किंवा पद्व्युत्तर पदवी शिक्षणक्रमांना प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना YOSOT 2020 या योजनेचे सदस्यत्व घेता येईल.
  • सदस्यत्व निःशुल्क असेल.
  • विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या YOSOT मोबाईल ऍप द्वारे सदस्यत्वाची नोंदणी करावयाची आहे.

2. सदस्य विद्यार्थाने करावयाची कृती

  • विविध प्रकारच्या झाडांच्या नावांची यादी विद्यापीठामार्फत देण्यात देण्यात येईल. विद्यार्थ्याने त्याच्या आवडीप्रमाणे व उपलब्धतेनुसार त्यातील एक झाड निवडावे.
  • निवडलेल्या झाडाचे रोप विद्यार्थ्याने मिळवावे. विद्यापीठाकडून रोपांचा पुरवठा होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • त्यानंतर विद्यार्थ्याने योग्य जागा निवडावी व त्या जागेवर त्याचे रोपण करावे.
  • विद्यार्थ्याने एका पेक्षा जास्त रोपे लावले तरीही फक्त एका रोपाचीच नोंद होईल व त्या आधारे नियमानुसार गुण देण्यात येतील.
  • रोप लावल्यानंतर त्याच वेळी विद्यार्थ्याने त्या रोपाचे पहिले छायाचित्र GPS टॅग सह YOSOT मोबाईल ऍप द्वारे अपलोड करावयाचे आहे. सदर छायाचित्रात रोपाचा प्रकार, आकार, रंग आणि परिसर स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर पुढील वर्षभर विद्यार्थाने या रोपाचे काळजीपूर्वक संगोपन करावयाचे आहे.
  • या दरम्यान विद्यार्थ्याने दर तीन महिन्यानी या रोपाचे छायाचित्र अपलोड करावयाचे आहे (जुलै, ऑक्टोबर, जानेवारी व एप्रिल महिन्याच्या पहिल्या ७ दिवसांत). याप्रकारे अंतिम परीक्षेपर्यंत एका वर्षात एकूण ४ छायाचित्रे अपलोड होतील.
  • एका वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी नवीन झाड लावणे आवश्यक आहे.

3. परिक्षण

  • विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या छायाचित्रांच्या डेटाची सॉफ्टवेअर द्वारे तपासणी करण्यात येईल.
  • विद्यार्थ्याने प्रत्येक वेळी त्याच रोपाचे छायाचित्र अपलोड केले आहे याची सॉफ्टवेअर द्वारेच GPS तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खातरजमा केली जाईल.
  • रोपाच्या जुन्या व नवीन छायाचित्रांची तुलना करून त्याच्या वाढीबाबतचे निरिक्षण डेटाबेस मध्ये नोंदविण्यात येईल.
  • प्रत्येक वेळी नवीन छायाचित्र अपलोड झाल्यानंतर त्याच्या योग्यतेबाबत विद्यार्थ्यास SMS द्वारे सूचित करण्यात येईल. त्यासोबतच त्याने योजनेत टिकून रहावे या दृष्टीने एक प्रोत्साहनपर प्रेरणादाई मेसेज देखिल पाठविण्यात येईल.

4. परीक्षेतील श्रेय

  • विहीत पध्दतीने वृक्षारोपण व संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणक्रमाच्या अंतिम परीक्षेत प्रोत्साहनपर अतिरिक्त श्रेय (गुण / श्रेणी अंक) देण्यात येईल. सदर गुणांची विभागणी पुढील प्रमाणे असेल –
    एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या शिक्षणक्रमांकरिता
    वर्ष नवीन रोपाच्या लागवडीसाठी मिळणारे श्रेय जुन्या रोपाच्या संवर्धनार्थ प्रोत्साहनपर मिळणारे श्रेय प्रोत्साहनपर मिळणारे एकूण श्रेय
    गुण श्रेणी अंक गुण श्रेणी अंक गुण श्रेणी अंक
    प्रथम 5 0.05 --- --- 5 0.05
    द्वितीय 5 0.05 5 0.05 10 0.10
    तृतीय 5 0.05 5 0.05 10 0.10
    एक वर्ष कालावधीच्या शिक्षणक्रमांकरिता
    5 0.05 5 0.05 10 0.10
  • रोपाची लागवड करून ते जगविल्यास प्रथम सत्राच्या शेवटी सदस्य विद्यार्थी 50% गुण मिळण्यास पात्र असेल. त्यानंतर त्याने रोपाची जोपासना करून ते वाढविल्यास द्वितीय सत्रात अंतिम परीक्षेत उर्वरित 50% मिळण्यास तो पात्र होईल.
  • विद्यार्थ्याने वेळोवेळी अपलोड केलेली छायाचित्रे जर खाली दिलेल्या पैकी कोणत्याही प्रकारात मोडत असतील तर ती गुण मिळण्यास ग्राह्य धरली जाणार नाहीत –
    • सर्व छायाचित्रांचे GPS लोकेशन जुळत नसेल.
    • रोप कुपोषित किंवा वाढ खुंटलेले असेल.
    • रोप मृत अवस्थेत असेल.