पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे.
झाडे जगली नाहीत तर श्वास कोठून घेणार. वनराईचे संरक्षण नाही केले तर या पृथ्वीवर फक्त वाळवंटच राहणार. आधुनिक युगात पर्यावरण फार बिघडत चालले आहे. यामुळे जगातील सर्व मानव सृष्टिच्या अस्तित्वाला फार मोठे दुर्धर संकेत निर्माण झाले आहेत. पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होत आहे व याचे भयानक परीणाम आपल्या समोर वारंवार येतच आहेत. वाढती कारखानदारी, सतत वाढते प्रदुषण यामुळे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण वाढत चालले व अनेक रोगांची उत्पती वाढतच आहे. वाढत्या शहरीकरणाची कुऱ्हाड पर्यावरणावर सतत कोसळत आहे. तसेच वातावरणात सतत उष्णता वाढत चालली आहे. वैज्ञानिकांच्या मते ग्लोबल वार्मिंग सारख्या संकटाला आपण आमंत्रण देत आहोत. ॠतुचक्रात बदल झाले व भर पावसाळ्यात उकाडा जाणवू लागला. माणसाने आपल्या सुखसुविधा साठी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान केले. याचे परिणाम किती भयानक असतात याची जाणीव माणसाला होत नाही, ही एक मोठी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे माणसाच्या आरोग्यावर तर परीणाम होतच आहे पण पक्षी व प्राण्यांचा प्रजातीच नष्ट होवू लागल्या आहेत. हे धोक्याचे संकेत आहेत. पृथ्वीवर माणसाला आपले अस्तित्व टिकवायचे असेल व येणाऱ्या पिढ्यांना चांगले वातावरण द्यायचे असेल तर सर्व मानव जातीला पर्यावरणाचा संरक्षणासाठी एक होवून काम करण्याची गरज आहे. प्रदुषणावर आळा घातला पाहिजे तसेच आसपासचे वातावरण शुद्ध ठेवले पाहिजे. पाण्याच्या व समुद्रातील जलप्रदूषणावर आळा घातला पाहीजे. झाडे लावून ती जगवली पाहीजेत. भारत सरकारच्या पर्यावरण संरक्षण मोहिमेत मोठ्या सख्येने भाग घेवून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास प्रत्येक व्यक्तीने हातभार लावला तरच या पृथ्वीवर मनुष्य जीवन राहील नाहीतर येणाऱ्या पिढ्यांना श्वास सुद्धा घेता येणार नाही व या पृथ्वीची अवस्था मंगळ व इतर ग्रहासारखी व्हायला वेळ लागणार नाही.
"झाडे लावा, झाडे जगवा" यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या “एक विद्यार्थी एक वृक्ष” या प्रकल्पात सहभागी व्हा.
कुलसचिव (प्रभारी), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
© यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. सर्व हक्क सुरक्षित.
Design by: Chittaranjan Infotech