विद्यार्थ्यांसाठी माहिती

सदस्य विद्यार्थ्याने करावयाची कृती

  • विविध प्रकारच्या झाडांच्या नावांची यादी विद्यापीठामार्फत देण्यात देण्यात येईल. विद्यार्थ्याने त्याच्या आवडीप्रमाणे व उपलब्धतेनुसार त्यातील एक झाड निवडावे.
  • निवडलेल्या झाडाचे रोप विद्यार्थ्याने मिळवावे. विद्यापीठाकडून रोपांचा पुरवठा होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • त्यानंतर विद्यार्थ्याने योग्य जागा निवडावी व त्या जागेवर त्याचे रोपण करावे.
  • विद्यार्थ्याने एका पेक्षा जास्त रोपे लावले तरीही फक्त एका रोपाचीच नोंद होईल व त्या आधारे नियमानुसार गुण देण्यात येतील.
  • रोप लावल्यानंतर त्याच वेळी विद्यार्थ्याने त्या रोपाचे पहिले छायाचित्र GPS टॅग सह YOSOT मोबाईल ऍप द्वारे अपलोड करावयाचे आहे. सदर छायाचित्रात रोपाचा प्रकार, आकार, रंग आणि परिसर स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर पुढील वर्षभर विद्यार्थाने या रोपाचे काळजीपूर्वक संगोपन करावयाचे आहे.
  • या दरम्यान विद्यार्थ्याने दर तीन महिन्यानी या रोपाचे छायाचित्र अपलोड करावयाचे आहे (जुलै, ऑक्टोबर, जानेवारी व एप्रिल महिन्याच्या पहिल्या ७ दिवसांत). याप्रकारे अंतिम परीक्षेपर्यंत एका वर्षात एकूण ४ छायाचित्रे अपलोड होतील.
  • एका वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी नवीन झाड लावणे आवश्यक आहे.