संकल्पना

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमात तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत.

वृक्ष म्हणजे जीवन - वृक्ष देतात फुले फळे  !
वृक्ष देतात - पाउस, पाणी,  थंडावा, वृक्षच देतात अन्न वस्त्र आणि निवारा !
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वृक्ष शोषून घेतात वातावरणातला कार्बन.... त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लावण्यासाठी पुढे आलं पाहिजे ''आपण'' !! वृक्ष लावून...पृथ्वीला संजीवनी द्यायची आहे आपण. म्हणूनच - आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  घेऊन येतंय एक  नाविन्यपूर्ण उपक्रम... ''योसो'' अर्थात
YCMOU’s One Student One Tree

हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे,
कृतार्थ जीवन या वृक्षांचे,
प्राणवायूचे कोष धरेचे !

या उपक्रमात विद्यापीठात शिकत असलेला प्रत्येक विद्यार्थी भाग घेऊ शकतो. पहिल्या वर्षी विद्यार्थाने 1 झाड लावायचे आहे, वर्षभर त्याची जोपासना करावयाची आहे, वेळोवेळी दिलेल्या मुदतीत अँप वरून फोटो घ्याचे आहेत. फोटो gps नोंदीसह असल्यामुळे दुसरीकडील फोटो चालत नाही अश्या प्रकारे पहिली वर्षी एकूण गुणात अतिरिक्त 5 गुण मिळतील पुढील वर्षी याच झाडाची जोपासना केल्यास परत 5 आणि तिसऱ्या वर्षात 5 असे 15 गुण मिळवता येतील. या शिवाय दुसऱ्या वर्षी व तिसऱ्या वर्षात नवीन झाडे लावता येतील त्याचे 5+5 असे 10 गुण तसेच दुसऱ्या वर्षाच्या झाडाची जोपासना करण्याचे 5 गुण मिळवता येते. असे पहिल्या वर्षी 5 दुसऱ्या वर्षी 10 व तिसऱ्या वर्षी 10 असे एकूण 25 गुण मिळू शकतील.

plantation

विद्यापीठाने यासाठी yosot नावाचे अँप तयार केलेले आहे ते गूगल प्ले वरून डाउनलोड करता येते.
किंवा

अँड्रॉइड मोबाईल मध्ये इथे क्लिक करून ते डाउनलोड करता येईल.
डाउनलोड अँप


आता हे अँप कसे वापरायचे ते बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अँप कसे वापरायचे?

मनोगत

मा.डॉ.प्रशांतकुमार पाटील

माननीय कुलगुरू

डॉ. प्रकाश देशमुख

कुलसचिव (प्रभारी)

ध्येय

वृक्ष-वल्ली ही पृथ्वीची श्वसनसंस्था आहे जी भुतलावरिल मानवासह सर्व सजीवांच्या जगण्यात मोलाचे योगदान देते. त्यामुळेच जागतिक तापमान वाढ व हवामान बदल या सारख्या समस्यांना तोंड देण्याकरिता जास्तीत जास्त झाडे लावत रहाणे ही काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे. या क्षेत्रात जगभरात अनेक चळवळी जोमाने कार्यरत आहेत. या विश्वहिताच्या महान कार्यात आपलेही योगदान असावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे मार्फत दिनांक १ जुलै २०२० पासून “YCMOU One Student One Tree (YOSOT) 2020” या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

उद्दीष्ट

आपल्या सभोवताली असणाऱ्या वृक्षसंपत्तीच्या अस्तीत्वाचे अनन्य साधारण महत्व पटवणे तसेच ती टिकविण्याच्या व वाढवण्याच्या प्रत्येकाच्या सामाजिक जबाबदारीचे भान सर्वांच्या मनात रुजवणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असल्याने राज्याच्या सर्व भागातून विद्यार्थी या विद्यापीठातील विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे आपोआपच ही योजना संपूर्ण राज्यभर व्यापकरित्या राबविली जाईल. विद्यापीठाच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या सहाय्याने महाराष्ट्राचे हरितकवच वृध्दिंगत करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून या विद्यापीठाने उचललेले हे पहिले पाऊल होय. YOSOT योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या मनात वृक्षारोपणाची आवड निर्माण करून त्यांना वृक्षांचे संरक्षण व संवर्धन या सामाजिक कर्तव्यांचे पालन करण्याची सवय लावणे हाच मानस आहे. दरवर्षी या योजनेत किमान ५ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग मिळविण्याचे ध्येय विद्यापीठाने ठेवलेले आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न

सतत विचारले जाणारे प्रश्न

सतत विचारले जाणारे प्रश्न

सतत विचारले जाणारे प्रश्न

सतत विचारले जाणारे प्रश्न

सतत विचारले जाणारे प्रश्न